Marathi Love Shayari — प्रेमाची ती गोडशी चव
by Zoya… जी प्रेमात हरवते, कधी शब्दात तर कधी शांततेत
कधी वाटतं प्रेम म्हणजे फक्त दोन लोकांची गोष्ट… पण खरं सांगू?
प्रेमात वेळ सुद्धा तिसरं पात्र बनतं.
कधी तो आपल्याला जवळ आणतो,
तर कधी त्याचाच थोडासा उशीर हृदयात बेचैनी आणतो.
Marathi Love Shayari लिहिणं माझ्यासाठी फक्त शब्द मांडणं नाही…
हे तर मनाच्या एका गुपित खिडकीतून भावनांना बाहेर येऊ देणं आहे.
चला, आज काही अशा शायऱ्या सांगते — ज्या कदाचित तुझ्या मनातली कहाणीही असू शकते.
जेव्हा तुझ्या डोळ्यात माझं घर दिसतं
तुझ्या नजरेत मला माझं आयुष्य दिसतं,
बाकीचं जग फक्त धूसर वाटतं…
तुटताना तारा मला आवर्जून पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको,
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून
एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय.
तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,
निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,
असे का बरे होते,
हेच का ते नाते, ज्याला आपण प्रेम म्हणतो.
आठवण नको तुझी साथ हवी,
तुझ्या प्रेमाची वाट हवी…
असे असावे प्रेम,
केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम,
केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम,
केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे..!
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.
काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो,
चमकणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो…
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?
माझं प्रेम, माझं आयुष्य,
माझं सगळ काही तूच आहेस…
कसं सांगू माझं सर्व काही तूच आहेस…
मी तुझा आहे का नाही हे माहीत नाही पन,
तु फक्त आणी फक्त माझी आहेस…
हे लक्षात ठेव…
प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.
गुलाबाने मोगऱ्याला विचारलं …
आपल्या दोघांत सुंदर कोण आहे …
गुलाबाने मोगऱ्याला विचारलं,
आपल्या दोघांत सुंदर कोण आहे …
मोगऱ्याने गुलाबाला सांगितल की सर्वात सुंदर ती आहे,
जी ही पोस्ट वाचत आहे…!
दूर असूनही जवळचं भासतं प्रेम
कितीही अंतर असो,
तुझा आवाज माझ्यासाठी रस्त्यासारखा — जो मला तुझ्यापर्यंत घेऊन जातो.
जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय,
जीवन सुंदर झालाय माझं,
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात,
चिंब चिंब मन न्हालंय माझं.
प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं.
प्रेम ही एक निरागस भावना आहे,
ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते,
फक्त असतो तो आदर,
आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा.
तिची वाट पाहून पाहून थकलो मी…
तिच्या नंतर ना कधी हसलो मी,
ना कधी शांत बसलो मी…
थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.
भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.
जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय,
आयुष्याचे अर्थ कळाले,
तुझ्या रूपानेच मला गं,
प्रेमरूपी दैवत मिळाले!
जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल…
जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.
“मैत्री ? माझी पुसू नकोस ,
कधी माझ्याशी रूसू नकोस ?,
मला कधी विसरू नकोस ,
मी दूर ?असून सोबत आहोत तुझ्या फक्त
माझ्या मैत्रीची ? जागा कोणाला देऊ नकोस.”
जीव तयार आहे तुझ्यासाठी,
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता ओळखशील ना?
आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही
आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.
पहिलं प्रेम नेहमी खास असतं
पहिलं प्रेम, पहिली नजर,
आयुष्यभर मनात उमलतं एकच फूल.
आठवणीत तुझ्या रमलोय मी,
तुला भेटण्यास आतुर झालोय मी…
ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो,
फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…
चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…
आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला
सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …
पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
जगातील सर्वात सुंदर मन तुझे आहे,
तुझ्या मनाची सुंदरता अपरंपार आहे…
देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.
तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.
“कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी,
हक्काची किंवा महत्त्वाची,
पण ती कधीही बदलणारी नसावी…
प्रेम म्हणजे फक्त
योग्य व्यक्ती शोधणे नव्हे
तर योग्य नाते निर्माण करणे.
विरहातली शायरी — जिथे आठवणींचीच मिठी असते
तुझ्या शिवाय दिवस जातो, पण वेळ जात नाही…
मनात फक्त तुझाच आवाज घुमत राहतो
अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.
“प्रेमात भीती अन भीतीमध्ये
प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता दोघांनी
खुशाल एकमेकांना ? साथ देत जगाव…”
ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो,
फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…
एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमीच पडतात
सोबत तुझ्या प्रत्येक क्षणात,
तुझी तारीफ करायला शब्द कमीच पडतात…
“पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळुक गार,
मी आरशात पाहतोय फार,
तिची आठवण मला खूप येते यार.”
गालावर खळी नको तिच्या…
फक्त जरा हसरी मिळावी.
चंद्राइतकी सुंदर नकोच…
फक्त परी लाजरी मिळावी.
तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.
प्रेमाच्या या छोट्या ओळींमध्ये किती भावना दडलेल्या असतात, नाही?
कधी हसू आणतात, कधी डोळे पाणावतात,
पण एक गोष्ट मात्र खरी — त्या मनात कायम राहतात.
Main Zoya hoon…
पिछली बार maine “Emotional Shayari For Love” लिहिली होती,
जिथे प्रेम आहे, पण मिठी नाही.
— तुझीच Zoya ❤️


