Love Shayari In Marathi

Love Shayari In Marathi

Love Shayari in Marathi – जेव्हा प्रेम शब्दांमध्ये कैद होतं
By Zoya

कधी असं झालंय का तुमच्यासोबत…
कोणीतरी आपल्या आयुष्यात येतं आणि सगळं काही बदलून टाकतं.
तुम्ही काहीही बोललात तरी, मनातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.
आज मी तुम्हाला माझ्या मनातल्या त्या भावना Love Shayari in Marathi मधून सांगणार आहे.

मनाला भिडणारी प्रेमाची पहिली कुजबुज

पहिल्या भेटीतच मन तुझं झालं,
तुझ्या डोळ्यांत हरवून माझं आयुष्य बदललं.

तुटताना तारा मला आवर्जून पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको,
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून
एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय.

असे असावे प्रेम,
केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम,
केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम,
केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे..!

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.

काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो,
चमकणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो…

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?

मी तुझा आहे का नाही हे माहीत नाही पन,
तु फक्त आणी फक्त माझी आहेस…
हे लक्षात ठेव…

प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

गुलाबाने मोगऱ्याला विचारलं …
आपल्या दोघांत सुंदर कोण आहे …
गुलाबाने मोगऱ्याला विचारलं,
आपल्या दोघांत सुंदर कोण आहे …
मोगऱ्याने गुलाबाला सांगितल की सर्वात सुंदर ती आहे,
जी ही पोस्ट वाचत आहे…!

आठवणींमध्ये जगणारं प्रेम

तू दूर असूनही माझ्यासोबत आहेस,
प्रत्येक श्वासात, प्रत्येक स्वप्नात, तूच आहेस.

प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं.
प्रेम ही एक निरागस भावना आहे,
ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते,
फक्त असतो तो आदर,
आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा.

तिची वाट पाहून पाहून थकलो मी…
तिच्या नंतर ना कधी हसलो मी,
ना कधी शांत बसलो मी…

थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.
भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय,
आयुष्याचे अर्थ कळाले,
तुझ्या रूपानेच मला गं,
प्रेमरूपी दैवत मिळाले!

अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे.

जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल…

“मैत्री ? माझी पुसू नकोस ,
कधी माझ्याशी रूसू नकोस ?,
मला कधी विसरू नकोस ,
मी दूर ?असून सोबत आहोत तुझ्या फक्त
माझ्या मैत्रीची ? जागा कोणाला देऊ नकोस.”

जीव तयार आहे तुझ्यासाठी,
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता ओळखशील ना?

आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही
आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.

न बोलता व्यक्त होणारं नातं

शब्दांआधी नजरेतलं सगळं बोललं,
तुझ्या हसण्यात माझं मन खोलवर गुंतलं.

ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो,
फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…

चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?

“तुझ्यात “मी”?
माझ्यात “तू”?
प्रेम ? आपले
फुलत राहू…
नजर नको कोणाचे लागव
म्हणून “अधून मधून”? भांडत जाऊ.

आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला
सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …
पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

अबोल तू अस्वस्थ मी,
अक्षर तू शब्द मी,
समोर तू आनंदी मी,
सोबत तू संपूर्ण मी.

फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.

तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

“कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी,
हक्काची किंवा महत्त्वाची,
पण ती कधीही बदलणारी नसावी…

वेगळं असूनही न तुटणारं प्रेम

अंतरं वाढली तरी हृदयात तूच आहेस,
काळ बदलला तरी आपलं प्रेम तसंच आहे.

प्रेम म्हणजे फक्त
योग्य व्यक्ती शोधणे नव्हे
तर योग्य नाते निर्माण करणे.

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.

“प्रेमात भीती अन भीतीमध्ये
प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता दोघांनी
खुशाल एकमेकांना ? साथ देत जगाव…”

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमीच पडतात
सोबत तुझ्या प्रत्येक क्षणात,
तुझी तारीफ करायला शब्द कमीच पडतात…

“पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळुक गार,
मी आरशात पाहतोय फार,
तिची आठवण मला खूप येते यार.”

गालावर खळी नको तिच्या…
फक्त जरा हसरी मिळावी.
चंद्राइतकी सुंदर नकोच…
फक्त परी लाजरी मिळावी.

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

Main Zoya hoon…

पिछली बार मी “Best 30+ Barish Shayari Love” लिहिली होती,
आज तुमच्यासाठी मराठीतली प्रेमाची गोष्ट घेऊन आले आहे.
जिथं प्रेम असेल… पण सोबत नसेल.

Scroll to Top